डिजिटल अटक ‘ काय आहे ही भानगड ?

‘डिजिटल अटक ‘ काय आहे ही भानगड ?
सायबर गुन्हेगारांनी आपली फसवणूक करण्यासाठी शोधून काढलेली एक नवी कल्पना ! तुमच्या नावाचे एक पार्सल सापडलय त्यात २-३ पासपोर्ट , क्रेडिट कार्डस् आणि ड्रग्स आहेत , तुमचे बॅंक अकाऊंट मनी लाउंडरींगसाठी वापरले जातेय , तुमच्या आधार कार्डाचा वापर करून अनेक सिम कार्ड्स घेतली गेली आहेत अशा थापा मारून घाबरवून टाकलं जात . आणि मग घरात नाही तर एखाद्या हॅाटेलच्या खोलीत सतत व्हिडिओ कॅाल समोर बसून राहण्याची जबरदस्ती केली जाते . ED , CBI , Narcotics अशा विविध खात्यांचे तोतया अधिकारी येऊन धमकावायला सुरवात करतात . काही वेळेला तर कोर्टाचा सीन उभा करून सुनावणी सुरू केली जाते . या सगळ्यांचा शेवट सेटलमेंट वर होतो . आहे ते सगळे पैसे बॅंक अकाउंट मधून ट्रान्सफर करायला लावतात . यात तुमच्या आमच्या सारख्यांनी ७ कोटी रूपयांपासून ३-४ लाखापर्यंत पैसे गमावले आहेत .
हे सगळं ऐकल्यावर , वाचल्यावर पहिला प्रश्न मनात येतो की असे कसे काय लोक पैसे देतात ? काही लोक तर अशा घटनांची आणि पीडितांची चेष्टा करतात . पण या घटनां मागच्या काही मुलभूत गोष्टींचा आपण विचार करायला हवा .
१ . जनजागृती, सायबर वेलनसचे प्रशिक्षण सर्व वयोगटांसाठी याची व्याप्ती वाढवायला हवी .
२. वर नावे घेतलेल्या Law Enforcement Agencies ने आपली प्रतिमा बदलण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. गुन्हेगारांना तुमची भीती वाटली पाहिजे खर आहे पण सर्व सामान्यांना तुमच्या बद्दल विश्वास कसा वाटेल यावर प्रयत्न झाले पाहिजेत.
३. कुठल्याही गुन्ह्यातून बाहेर पडायचे असेल तर सेटलमेंट करावी लागते , पैसे दिले की सुटका होते हे इतकं मनावर बिंबवले गेलय की या गुन्ह्यातून बाहेर पडण्यासाठी लोक कुठलाही प्रतिकार न करता , प्रश्न न विचारतां पैसे देतात .
४. कायदा सोपा करून सांगायला हवा व आपल्या कायदेशीर अधिकारांची जाणीव प्रत्येकाला हवी .
५. Cyber Resilience- सायबर प्रतिकारशक्ती वाढवायला हवी . अशा घटना घडणारच हे गृहीत धरून कुठे मदत मिळू शकेल याची माहिती जवळ बाळगायला हवी .
६. सायबर स्कॅम्स हा आता मोठा Organise Crime हे लक्षात घेऊन शासनाने उपाय योजना करायला हव्यात .
७ . या घटनातील पीडितांना मानसिक आधाराची गरज असते हे लक्षात घेऊन नातेवाईकांना मानसिक आरोग्य तज्ञाची मदत घ्यायला हवी .

वर सांगितल्याप्रमाणे कुठलेही कॅाल आले तर न घाबरता block करा . काहीही मदत लागली तर Responsible Netism च्या
सायबरवेलनेस हेल्पलाईन ७३५३१०७३५३ वर मदत मागा .
मला सोशल मिडियावर मदतीसाठी मेसेज करा .
मदत फक्त एका कॅालवर , मेसेजवर आहे .

सायबरवेलनेस #reponsiblenetism

@highlight

Leave a Reply

Advertise here